Team Agrowon
१०० टक्के पाण्यात विद्राव्य असल्यामुळे आणि त्यातील अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात असल्यामुळे पिकांस लगेच उपलब्ध होतात.
निर्यातक्षम गुणवत्तेचे अधिक उत्पादन मिळते. पिकांना पाणी आणि अन्नद्रव्यांचा नियमित पुरवठा होत असल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते.
पिकांच्या गरजेनुसार व अवस्थेनुसार दररोज अथवा दिवसाआड देता येतात.
थेट पिकांच्या मुळांच्या कक्षेत दिली जातात, ती मुळांना त्वरित उपलब्ध होतात.
खते सौम्य द्रावणातून दिली जात असल्यामुळे मुळावर अनिष्ट परिणाम होत नाही.
खते देण्याची पद्धत अतिशय सोपी असल्यामुळे वेळ, मजूर, खर्च, ऊर्जा, यंत्रसामग्रीची बचत होते.
खते रोज कमी मात्रेत दिली जात असल्यामुळे अन्नद्रव्ये निचऱ्यावाटे, स्थिरीकरणाद्वारे वाया जात नाहीत.
खते आम्लधर्मीय असल्यामुळे जमिनीचा सामू नियंत्रण करण्यास मदत होते. ठिबक संचात क्षार साचत नाहीत. ड्रीपर्स बंद पडत नाहीत.