Aslam Abdul Shanedivan
उष्णता आणि पाऊस अनेक आजार घेऊन येतात. अशावेळी पायांच्या तळव्यांमध्ये जळजळ होण्याचे प्रमाण वाढते. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
पायाच्या तळव्यामध्ये जळजळ होण्याचे कारण तुमच्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असू शकते. तसेच इतरही काही कारणे असू शकतात
पाय दुखणे आणि पायांच्या तळव्यांमध्ये जळजळ होण्याची समस्या महिलांमध्ये सर्वाधिक दिसून येते.
पायाच्या तळव्यामध्ये जळजळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. यातील पहिले कारण म्हणजे व्हिटॅमिन बी १२ आणि बी ६ ची कमतरता
काहीवेळा किडनीच्या समस्येमुळे देखील पायांच्या तळव्यांना जळजळ होणे किंवा पाय दुखणे अशा समस्या वाढू शकतात
काही वेळेला तळव्यांना जळजळ होण्याचे कारण थायरॉईडची पातळी कमी होणेही असू शकते. यामुळे पायांना मुंग्या येणे आणि जळजळ जाणवू शकते
तळवे मध्ये जळजळ केवळ जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळेच नाही तर मधुमेहामुळे देखील होऊ शकते. (अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)