Mango Processing : या पदार्थांमुळे वर्षभर आंबा चाखता येणार

Team Agrowon

वर्षभर साठवण

आंबा हा कच्च्या आणि पिकलेल्या दोन्ही स्वरुपामध्ये आवडीने खाल्ला जातो. मात्र, नैसर्गिकरीत्या वर्षातील काही महिनेच उपलब्ध असलेल्या या फळांवर योग्य प्रक्रिया केल्यास वर्षभर साठवणे शक्य आहे.

Mango Processing | Agrowon

विविध पदार्थांची निर्मिती

आंब्यापासून कच्च्या (कैरी) आणि पक्व अशा दोन्ही अवस्थेमध्ये विविध पदार्थांची निर्मिती करता येते.

Mango Processing | Agrowon

लोणचे

लोणच्याचे खारे आणि तेलाचे असे दोन प्रकार आहेत. त्यातही कोयीसह आणि कोयीविना असे आणखी उपप्रकार पडतात.

Mango Processing | Agrowon

चटणी

यामध्ये विविध प्रकार असून, कच्च्या किंवा अर्धवट पिकलेल्या कैरी पासून चटणी तयार करतात.

Mango Processing | Agrowon

वाळवलेले किंवा निर्जलीकरण केलेले काप

सालीसह किंवा सालीविना कैऱ्या सूर्यप्रकाशामध्ये वाळवल्या जातात. अशा वाळवलेल्या कैऱ्यापासून भुकटी तयार केली जाते, त्याला आमचूर म्हणतात.

Mango Processing | Agrowon

कैरीची साठवण

विविध प्रक्रियासाठी आमचूर किंवा खटाई किंवा कैरी भुकटी वापरता येते. त्यातून वर्षभर कैरीची चव चाखता येते. ही कैरी मिठासह किंवा शिवाय गोठवता येते.

Mango Processing | Agrowon

प्युरी

आंब्याचे प्युरीमध्ये रूपांतर केले जाते. या प्युरीचा उपयोग पुढील रस, स्क्वॅश, जॅम, जेली आणि अन्य निर्जलीकरण उत्पादनासाठी करता येतो.

Mango Processing | Agrowon

वाळवलेले किंवा निर्जलीत काप

पिकलेले आंब्याचे काप वाळवून पूर्ण काप किंवा भुकटीच्या स्वरुपात साठवले जातात. वाळवण्यासाठी सूर्यप्रकाश, टनेल डिहाड्रेशन, व्हॅक्यूम ड्रायिंग, ऑस्मोटीक डिहायड्रेशन या पद्धतीचा वापर केला जातो.

Mango Processing | Agrowon