sandeep Shirguppe
तुमच्या शरिराला थंड ठेवण्यासाठी बडीशेपचे पाणी फायदेशीर ठरु शकते. याचा फायदा कसा होईल पाहूया.
२ चमचे लिंबू, १/२ कप बडीशेप, ३ ते ४ पुदिन्याची पाने, चवीनुसार साखर, चवीनुसार काळे मीठ घ्या.
बडीशेपचा ज्यूस बनवण्यासाठी बडीशेप धुवून दोन ते तीन तास पाण्यात भिजवा
त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. वरील सर्व साहित्य बारीक करुन त्याची पावडर तयार करा.
ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात पेस्ट घाला वरुन लिंबाचा रस घाला, तुम्हाला ज्यावेळी पाणी पिऊ वाटेल त्यावेळी याच सेवन करा.
यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे आपल्या शरीराला फायदेशीर ठरतात.
याचे सेवन केल्याने डिहायड्रेशनची समस्या देखील टाळता येते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.