New Species Gecko : तेजस उद्धव ठाकरेंच्या टीमने लावला दोन नव्या प्रजातींच्या पालींचा शोध

sandeep Shirguppe

पालींचा शोध

तमिळनाडूतील पश्चिम घाटामध्ये पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांना यश आले आहे.

New Species Gecko | agrowon

तेजस ठाकरे

कोल्हापूरच्या अक्षय खांडेकर यांच्यासह तेजस ठाकरे, ईशान अगरवाल यांचा सहभाग आहे.

New Species Gecko | agrowon

पालींचे सर्वेक्षण

या फाउंडेशनकडून सुरू असलेल्या भारतीय द्वीपकल्पामधील पालींच्या सर्वेक्षणादरम्यान या पाली प्रथमतः आढळून आल्या.

New Species Gecko | agrowon

निमास्पिस कुळे

नव्याने शोधलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमास्पिस कुळात केलेला आहे. गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

New Species Gecko | agrowon

दुर्मीळ पाली

रंग, आकार, मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील ट्युबरकलची रचना आणि जनुकीय संचाच्या वेगळेपणावरून दोन्ही पाली कुळातील इतरांपासून आणि एकमेकांपासून वेगळ्या ठरतात.

New Species Gecko | agrowon

निमास्पिस व्हॅनगॉगी

नव्याने शोधलेली 'निमास्पिस व्हॅनगॉगी' ही प्रजात तमिळनाडू राज्यातील श्रीविल्लीपुथूर-मेघमलाई व्याघ्र प्रकल्पामधे आढळली.

New Species Gecko | agrowon

चित्रकार वॅन गॉग

निमास्पिस व्हॅनगॉगी या प्रजातीचे नामकरण प्रसिद्ध चित्रकार वॅन गॉग यांच्या नावावरून केलेले आहे.

New Species Gecko | agrowon

'निमास्पिस सथुरागिरीएन्सिस'

'निमास्पिस सथुरागिरीएन्सिस' ही प्रजात तमिळनाडूच्या विरुदुनगर जिल्ह्यातील साथुरागिरी पर्वतावर आढळून आली.

New Species Gecko | agrowon

छोटे कीटक प्रमुख खाद्य

नव्याने शोध लागलेल्या दोन्ही पाली दिनचर आहेत. छोटे कीटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.

New Species Gecko | agrowon