sandeep Shirguppe
अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असलेली मसूर डाळ आपल्यातील अनेक जण चवीने खातात.
कर्बोदके आणि समृद्ध फायबर्समुळे मसूर डाळ वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
शरीरातील खराब कॉलेस्ट्रॉलची समस्या कमी होण्यासाठी मसुर डाळीचा आपल्या आहारात समावेश असावा.
मसूर डाळीमध्ये प्रथिनांचे आणि कर्बोदकांचे भरपूर प्रमाण असल्याने फार भूक लागत नाही. याने शरीराचे वजन नियंत्रणात राहते.
पोटाच्या आणि पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात मसूर डाळीचा जरूर समावेश करा.
मसूर डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो, त्यामुळे या डाळीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते.
मसूर डाळ ही अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. या डाळीचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
खोकला, सर्दी, ताप आणि संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करण्याचे काम मसूर डाळ करते.