Anuradha Vipat
थोड्या बेकिंग सोड्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांवर लावून २ मिनिटे हलक्या हाताने घासा.
टूथपेस्टमध्ये थोडे मीठ मिसळून घासल्याने दातांवरील पिवळेपणा कमी होतो.
केळीच्या सालेचा आतील पांढरा भाग दातांवर १-२ मिनिटे घासा.
कडुलिंबाच्या काड्यांनी दात घासल्याने केवळ दात पांढरे होत नाहीत, तर हिरड्यांचे आरोग्यही सुधारते
सकाळी उठल्यावर १ चमचा खोबरेल तेल तोंडात धरून ५-१० मिनिटे गुळण्या करा.
जास्त चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्स पिणे टाळा, कारण यामुळे दातांवर डाग पडतात.