Anuradha Vipat
चहा पुन्हा गरम करून पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
चहा बनवून ४ तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर ठेवल्यास त्यात जीवाणू आणि बुरशी वाढू लागते.
दुधाचा चहा असेल तर जीवाणू आणि बुरशीचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो.
चहामध्ये असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स पुन्हा गरम केल्यामुळे पूर्णपणे नष्ट होतात.
चहा पुन्हा गरम केल्यावर पोटात ॲसिडिटी, छातीत जळजळ, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात.
चहाच्या पानांमधील संयुगे पुन्हा गरम केल्यावर बदलतात जे यकृतासाठी हानिकारक ठरू शकतात.
चहा नेहमी ताजा आणि बनवल्यानंतर १५-२० मिनिटांच्या आत पिणे सर्वोत्तम असते.