Anuradha Vipat
चहा हे अनेकांचा आवडते पेय असले तरी चहासोबत काही पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
खारट पदार्थ खाल्ल्यानंतर चहा प्यायल्यास पोटातील ॲसिडिटी वाढते. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
लिंबू किंवा आवळ्यासारखे आंबट , तुरट पदार्थ चहात मिसळल्यास चहा फाटण्याची शक्यता असते आणि ते आरोग्यासाठीही चांगले नसते.
चहा गरम असतो आणि त्यानंतर लगेच थंड पदार्थ खाल्ल्यास पचनसंस्थेवर परिणाम होतो.
भजी, वडे, समोसे यांसारखे तळलेले आणि बेसनयुक्त पदार्थ चहासोबत खाल्ल्यास पचनासाठी जास्त वेळ लागतो.
ज्या पदार्थांमध्ये हळदीचा वापर केला आहे. ते चहासोबत खाणे टाळावे.
चहामध्ये 'टॅनिन' नावाचा घटक असतो, जो शरीराला अन्नातील लोह शोषून घेण्यापासून रोखतो.