Anuradha Vipat
चहावर प्रेम करणारे बहुतेक लोक याची काळजी घेत नाहीत की त्याचे जास्त सेवन केल्याने आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते.
चला तर मग आज आपण एका दिवसात चहा पिण्याची मर्यादा काय आहे हे जाणून घेऊयात
एका दिवसात ३-४ कप चहा पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, पण जास्त प्रमाणात चहा पिणे टाळणे आवश्यक आहे.
जास्त चहा पिल्याने निद्रानाश, अस्वस्थता आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात
दिवसातून ४ कप पेक्षा जास्त चहा पिल्याने छातीत जळजळ, ऍसिडिटी आणि इतर पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, असे तज्ञांचे मत आहे.
चहा पिण्याची योग्य मात्रा व्यक्तीपरत्वे बदलू शकते. ज्यांना कॅफीनची ऍलर्जी आहे किंवा इतर आरोग्य समस्या आहेत त्यांनी चहाचे सेवन कमी करावे.
चहामध्ये कॅफिन भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे ताजेपणा मिळतो, पण तुम्हाला पुन्हा चहाचे व्यसन लागते