Anuradha Vipat
त्वचेची देखभाल करण्यासाठी कोरफड ही औषधी वनस्पती चांगली मानली जाते. चला तर मग जाणून घेऊया अॅलोव्हेरा जेल तयार करण्याची पद्धत.
कोरफडीचे एक पान, एक छोटा चमचा, मिक्सर, एक हवाबंद डबी, व्हिटॅमिन सी पावडर किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल
जेल तयार करण्यासाठी ३० मिनिटे लागू शकतात. कोरफडीच्या रोपाचे मोठे पान घ्यावे.
चाकूच्या मदतीने पानाच्या टोकरी कडा कापून घ्या. यानंतर यातील गर काढावा.
चमच्याच्या मदतीने गर काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरफडीचा गर टाका आणि पातळ पेस्ट तयार होईपर्यंत गर वाटून घ्या.
तयार झालेल्या पेस्टमध्ये व्हिटॅमिन सी पावडर किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा.
तुम्हाला नको असल्यास व्हिटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन ई मिक्स करू नये. केवळ कोरफडीचा गर चेहऱ्यासाठी वापर करू शकता.