Anuradha Vipat
चहा आणि सिगारेटचे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते.
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी गरम चहाचे किंवा इतर गरम पेयांचे सेवन केल्यास कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो.
सिगारेटमध्ये निकोटिन आणि इतर अनेक हानिकारक रसायने असतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका असतोच.
जेव्हा खूप गरम चहा पिला जातो तेव्हा अन्ननलिकेच्या नाजूक पेशींना इजा होते.
सिगारेटमधील रसायने आणि गरम चहामुळे झालेली इजा एकत्र आल्यावर कर्करोगाचा धोका वाढतो.
सिगारेट ओढणे हे कोणत्याही परिस्थितीत आरोग्यासाठी हानिकारकच आहे
आरोग्याच्या दृष्टीने धूम्रपान पूर्णपणे टाळणे आणि चहा नेहमी कोमट करून पिणे हेच योग्य आहे.