Anuradha Vipat
तांदुळजा ही शरीराला थंडावा देणारी, सहज पचणारी आणि अनेक आजारांवर रामबाण ठरणारी अत्यंत गुणकारी रानभाजी आहे.
आयुर्वेदात या पालेभाजीला औषधी गुणांचा खजिना मानले गेले आहे, ज्यामुळे ती अनेक शारीरिक तक्रारींवर उत्तम उपाय ठरते.
तांदुळजा भाजी 'शीतवीर्य' (थंडावा देणारी) असल्याने डोळ्यांची आग कमी करते.
ही भाजी अत्यंत पाचक आणि लघु (हलकी) असल्याने शरीराला सहज पचते.
ही भाजी रुचकर असून भूक मंदावण्याची समस्या दूर करते.
तांदुळजा भाजी उत्तम 'रक्तदोषहारक' आहे, जी शरीरातील रक्तातील अशुद्धी दूर करते
शरीरातील वाढलेले पित्त आणि उष्णता कमी करण्यासाठी तांदुळजा खाणे अत्यंत फायदेशीर आहे.