Anuradha Vipat
शेपूची भाजी ही विशिष्ट सुगंध आणि चवीसाठी ओळखली जाणारी एक अत्यंत गुणकारी पालेभाजी आहे.
आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानानुसार शेपूला औषधी वनस्पती मानले जाते.
यामध्ये विटामिन 'सी' आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराला विविध प्रकारचे संसर्ग आणि फ्लूपासून वाचवतात.
शेपूमध्ये असलेले विशिष्ट एन्झाइम्स आणि विटामिन्स मेंदूला शांत ठेवण्यास मदत करतात. ज्यांना रात्री झोप न येण्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही भाजी फायदेशीर आहे.
शेपू रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्सची पातळी कमी करते. त्यामुळे रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारून हृदयविकाराचा धोका कमी होतो.
महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखी आणि पेटक्यांवर शेपूची भाजी खाणे अत्यंत गुणकारी ठरते.
शेपूमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर जास्त असते. यामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.