Agriculture Budget : 'एक गाव, एक पीक' योजना 'या' राज्यात होणार सुरू

Aslam Abdul Shanedivan

तामिळनाडू कृषी अर्थसंकल्प

तामिळनाडूच्या कृषी अर्थसंकल्पात, राज्याचे कृषी उत्पादन वाढवण्यासाठी 'एक गाव एक पीक' योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Agriculture Budget | Agrowon

एकात्मिक पोषक व्यवस्थापन

या योजनेत शेतजमीन तयार करणे, बियाणे प्रक्रिया आणि एकात्मिक पोषक व्यवस्थापन यांसारख्या बाबींचा समावेश करण्यात येणार आहे.

Agriculture Budget | Agrowon

कृषी मंत्री पनीरसेल्वम

तमिळनाडूचे कृषी मंत्री एम.आर.के पनीरसेल्वम यांनी विधानसभेत २०२४-२५ चा कृषी अर्थसंकल्प सादर केला

Agriculture Budget | Agrowon

भरड धान्य मिशन योजना

त्यांनी, तामिळनाडूमध्ये भरड धान्य मिशन योजना २०२४-२५ मध्ये ६५.३० कोटी रुपयांच्या खर्चासह सुरू राहील असे सांगितले.

Agriculture Budget | Agrowon

'एक गाव, एक पीक' योजना

यासोबतच कृषी उत्पादन वाढवण्यासाठी १५,२८० महसुली गावांमध्ये 'एक गाव, एक पीक' योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

Agriculture Budget | Agrowon

पाच ते १० एकर जमिनीवर प्रात्यक्षिक

शेतकऱ्यांमध्ये जागरुकता करत एका गावात एका पिकावर पाच ते १० एकर जमिनीवर हे प्रात्यक्षिक केले जातील

Agriculture Budget | Agrowon

पिंकाची यादी

भात, चोलम (ज्वारी), मका, कंबु (बाजरी), कुडीरावली (बाजरी), नाचणी, लाल हरभरा, काळा हरभरा, हरभरा, भुईमूग, सूर्यफूल, कापूस आणि ऊस ही पिके या योजनेच्या कक्षेत ठेवली जातील.

Agriculture Budget | Agrowon

Pandhari Sheth Phadke : बैलगाडा शर्यतींचा ग्लॅमर चेहरा 'पंढरीशेठ फडके' बिनजोड छकडेवाला

आणखी पाहा