Mahesh Gaikwad
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींची वेगळीच क्रेझ आहे. ग्रामीण भागापासून ते मुंबईसारख्या शहरांमध्येही आपल्याला बैलगाडा शौकीन पाहायला मिळतात.
अशाच बैलगाडा शौकीनांपैकी प्रसिध्द नाव म्हणजे पंढरीशेठ फडके. मुळचे पनवेलच्या विहिघरचे असणारे पंढरीशेठ यांची राज्यात बैलगाडा शौकीन म्हणून ओळख आहे.
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते.
अंगावर मोठ्या प्रमाणात सोने परिधान करण्याऱ्या पंढरीशेठ यांची बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन अशीही वेगळी ओळख.
महाराष्ट्रात कोठेही बैलगाडा शर्यतीचे मैदान असेल तिथे पंढरीशेठ फडके हे समिकरण ठरलेलंच असते. आजही त्यांच्या दावणीला जवळपास ४०-५० शर्यतीचे बैल आहेत.
बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्री, अंगावरील सोने आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची.
एखादा बैल नजरेत बसला, की त्यासाठी कितीही पैसे मोजणारे बैलमालक पंढरीशेठ यांच नुकतंच निधन झाले.
बैलगाडा शर्यतींना खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून देणाऱ्या पंढरीशेठ यांच्या निधनामुळे बैलगाडा शर्यत शौकीनांमध्ये दु:खाचे सावट पसरले आहे.