Livestock Management : भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांसाठी झाले जिकीरीचे?

Mahesh Gaikwad

दुग्ध व्यवसाय

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. हमखास पैसा देणारा दूध व्यवसाय शेतकऱ्याच्या अडीअडचणीला आर्थिक निकड भागविण्यासाठी फायद्याचा ठरतो.

Livestock Management | Agrowon

दूध धंदा आतबट्ट्याचा

पण अलिकडच्या काळात दुधाला मिळणारा दर, दूध भेसळ यासारख्या प्रश्नांमुळे दूध धंदा शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा ठरत आहे.

Livestock Management | Agrowon

दूध उत्पादन

दुग्ध व्यवसायात दूध उत्पादनात सातत्य ठेवणे महत्त्वाचे असते. दुग्ध व्यवसायात भाकड जनावरांची मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर असते.

Livestock Management | Agrowon

भाकड जनावरे

भाकड जनावरे सांभाळणे म्हणजे तोट्याचा सौदा असे म्हटले जाते. कारण भाकड जनावरे आणि गायी-म्हशींच्या नर पिल्ले सांभाळणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असते.

Livestock Management | Agrowon

गोवंश बंदी हत्या कायदा

त्यातच गोवंश बंदी हत्या कायद्यामुळे भाकड जनावरे सांभाळण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहिलेला नाही.

Livestock Management | Agrowon

भाकड पशुधन विक्री

त्यामुळे एकीकडे हे भाकड पशुधन विक्री करण्यासाठी कायदेशीर बंदी आहे. तर ते सांभाळण्याची आर्थिक ताकद शेतकऱ्यांमध्ये नाही.

Livestock Management | Agrowon

गोशाळा

गोशाळांमध्येही भाकड पशुधन ठेवण्याला मर्यादा आहेत. त्यामुळे भाकड जनावरे आणि संकरित गायींना होणाऱ्या नर वासरांचे करायचे काय हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

Livestock Management | Agrowon

दुष्काळाचे सावट

सध्या महाराष्ट्रारावर दुष्काळाचे सावट आहे. अशात आहे तीच जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांसाठी शक्य नसल्याने गावोगावी भाकड आणि नर वासरे सोडून दिलेली दिसत आहेत.

Livestock Management | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....