Mahesh Gaikwad
भारतात अनेक देशी गोवंशांच्या प्रजाती पाहायाला मिळतात. या देशी गोवंशांच्या संवर्धनाचे प्रयत्नही सध्या केले जात आहेत.
पुंगनूर ही सुध्दा भारतातीलच गायीची एक दुर्मिळ प्रजाती आहे. ही जगातील सर्वात कमी उंची असणारी गाय भारतात पाहायला मिळते.
या गायीची प्रजाती प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील चित्तुर जिल्ह्यामध्ये आढळते. येथील पुंगनूर गावाच्या नावानेच गायीच्या या प्रजातीला ओळखले जाते.
पुंगनूर प्रजातीच्या या गायीची उंची अवघी अडीचे ते तीन फूट इतकीच असते. या गायीच्या नवजात वासराची जन्मावेळीची उंची अवघी १६ ते २२ इंच एवढी असते.
पुंगनूर गायीच्या दूध अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असे असते. अनेक प्रकारच्या आजारांवर रामबाण उपाय म्हणून गायीचे दूध गुणकारी मानले जाते.
तीन फूट उंची असली तरी ही गाय दिवसाला तीन ते पाच लिटरपर्यंत दूध देते.
पुंगनूर सारख्या दुर्मिळ गायीची प्रजाती केवळ आंध्र प्रदेश पुरतीच मर्यादित राहिली आहे. हळूहळू या गायीची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून सध्या तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत.