Roshan Talape
खरीप हंगाम-२०२४ मधील पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची कामगिरी सुरु झाली आहे.
शेतकऱ्यांना २२ मेपर्यंत एकूण ३,७७७ कोटी रुपयांची भरपाई मिळण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यापैकी ३,२७९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून सर्वाधिक २,७७१ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे.
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून ७१३ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे.
काढणी नंतरच्या नुकसान भरपाईसाठी २७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
पीक कापणी प्रयोगावरून केवळ १८ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे.
खरीप २०२५ पासून पीक विम्यात फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई दिली जाईल, इतर ट्रिगर वगळले जातील.