Anuradha Vipat
नॉनस्टिकची भांडी वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
जास्त तेल वापरल्याने नॉनस्टिकचे कोटिंग खराब होऊ शकते.
भांडी गरम असताना लगेच धुवू नका. गरम असताना पाण्यात टाकल्यास भांड्याला नुकसान होऊ शकते.
नॉनस्टिक भांडी धुण्यासाठी कधीही स्टीलचे स्क्रबर किंवा कठीण स्पंज वापरू नका. मऊ स्पंज किंवा कापडाने धुवा.
भांडी स्वच्छ करताना सौम्य साबण आणि कोमट पाण्याचा वापर करा. कठीण डाग काढण्यासाठी मीठ आणि गरम पाण्याचा वापर करा
नॉनस्टिक भांडी जास्त वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास त्यांचे कोटिंग खराब होऊ शकते.
धातूचे चमचे वापरल्यास भांड्याला स्क्रॅच पडू शकतात. त्यामुळे लाकडी किंवा प्लास्टिकचे चमचे वापरा.