Roshan Talape
खरीपातील उभ्या पिकांत हलकी कोळपणी केल्यास भेगा पडत नाहीत आणि जमिनीतील ओलावा टिकण्यास मदत होते.
सोयाबीन, तूर भुसा किंवा वाळलेले गवत वापरून सरींमधील आच्छादन करा, त्यामुळे मातीतील आर्द्रता टिकते.
१% पोटॅशियम नायट्रेट द्रावणाची फवारणी केल्यास बाष्पीभवन कमी होते आणि पिके सशक्त राहतात.
तुषार सिंचनामुळे पिकांना गरजेनुसार पाणी मिळते आणि पाणी वाया जात नाही.
ट्रॅक्टर बूम स्प्रेच्या मदतीने चार दिवसांच्या अंतराने पाण्याचा फवारा द्या, जेणेकरून उभ्या पिकांचे रक्षण होईल.
पेरणीनंतर ३०–३५ दिवसांनी सऱ्या काढल्यास पावसाचे पाणी मुरते आणि जमिनीत ओलावा टिकतो.
शेतात ३–४ तास फवारा ठेवल्यास पिके वाचतात आणि वाढीवर परिणाम होत नाही.
कालव्याचे पाणी शेततळ्यात साठवा व गरजेनुसार सिंचनासाठी वापरा.