Roshan Talape
पावसात पाय भिजल्यास तात्काळ धुऊन कोरडे पुसा. ओले पाय इन्फेक्शनसाठी जबाबदार असतात.
साचलेले पाणी रोगजंतूंनी भरलेले असते. अशा ठिकाणी चप्पल-बूट ओले होऊन इन्फेक्शन वाढते.
पावसात पाय ओले राहू देऊ नका, लगेच पुसून घ्यावेत.
पावसात रोज वेगळे चप्पल-बूट वापरा आणि ओले चप्पल-बूट सुकल्यावरच पुन्हा वापरा.
पाय धुऊन नीट वाळवल्यावर अँटीफंगल पावडर लावा. बुरशीजन्य इन्फेक्शनपासून संरक्षण मिळेल.
कॉटन मोजे ओलसरपणा शोषतात आणि पाय सुरक्षित ठेवायला मदत करतात.
मीठ घालून कोमट पाण्यात पाय भिजवल्यास पावसाळ्यातील इन्फेक्शन टाळता येते.
पावसाळ्यात पायाला जास्त त्रास झाल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.