Swarali Pawar
दोन वेळा हलकी कोळपणी केल्याने जमिनीत ओल टिकते आणि पिके १०-१५ दिवस तग धरतात.
तण पिकापेक्षा दुप्पट-तिप्पट पाणी पितात. त्यामुळे कोळपणी किंवा तणनाशक वापरून तण नष्ट करावे.
कपाशी, तूर, सोयाबीन वगैरे पिकांमध्ये सरी काढावी जेणेकरुन पाण्याचा निचरा आणि साठवण दोन्ही होईल.
फळबागेत झाडाभोवती मातीची भर घालावी. त्यामुळे ओलावा टिकतो आणि मुळे सुरक्षित राहतात.
प्लास्टिक, भाताचे तूस किंवा सोयाबीनच्या काड्यांनी आच्छादन करून जमिनीतील पाण्याची धूप थांबवा.
ठिबक, तुषार किंवा मटका सिंचन वापरा. विशेषतः संध्याकाळी बाष्पीभवन कमी होते.
जीवामृत, पोटाशियम नायट्रेट (13:00:45), 19:19:19, केओलीन फवारणीने ताण कमी होतो व उत्पादन टिकते.
पावसाचा अंदाज लक्षात घेऊन तण, रोग, कीड आणि पाणी यांचे नियोजन करा. कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास तात्काळ फवारणी करा.