Aslam Abdul Shanedivan
सध्या उत्पादनात वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जात आहे. ज्याचा परिणाम जमिनीच्या पोतवर होत आहे
तर रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, बाजारपेठेत होत असलेली बोगसगिरी लक्षात घेऊन आपल्याला रासायनिक खतांना पर्याय शोधायला हवा
रासायनिक खतांच्या वापराऐवजी इतर मार्गाने उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू संवर्धकाचा वापर करणे फायद्याचे ठरते.
मात्र ते वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. जिवाणू संवर्धक वापरताना बाटलीवर दिलेल्या अंतिम दिनांकापूर्वी वापरावी लागतात
तसेच रायझोबियम जिवाणू संवर्धक पिकाचा गट पाहून जिवाणू संवर्धक वापरावे.
जिवाणू संवर्धक हे कीडनाशक, बुरशीनाशके, तणनाशके आणि रासायनिक खतांच्यासोबत मिसळू नयेत.
जिवाणू संवर्धकाचा वापर करताना उपयुक्त जिवाणू जिवंत राहण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा, सेंद्रिय पदार्थ असावेत.