Mahesh Gaikwad
देशभरात मॉन्सूनच्या सरींचे आगमन झाल्याने शेतकरीही आनंदला आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
शेतीच्या मशागती आणि पेरणीसाठी शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करतात. पण आपल्या देशात मोठ्या संख्येने अल्पभूधारक शेतकरी आहेत.
अशा छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांकडे स्वत:चा ट्रॅक्टर नसल्याने दुसऱ्या शेतकऱ्यांकडील ट्रॅक्टर किंवा भाड्याच्या ट्रॅक्टरवर अवलंबून राहावे लागते.Agrowon
छोट्या शेतकऱ्यांची स्वत:चा ट्रॅक्टर खरेदी करण्याची ऐपत नसते. असे शेतकरी बजेट नसल्यामुळे ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही.
त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना परवडतील अशा ५ लांखांपेक्षा कमी आणि कामाला मजबूत अशा ५ ट्रॅक्टरची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारतात ५ लाख रुपयांच्या बजेटमध्ये काही नामांकित कंपन्यांचे ट्रॅक्टर बाजारात उपलब्ध आहेत. हे सर्व ट्रॅक्टर २१ ते ३० अश्वशक्ती इंजिन असलेले ट्रॅक्टरआहेत.
महिंद्रा कंपनीचा Mahindra 265-DI हा ३० एचपीचा ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरची किंमत ४.८० लाख ते ४.९५ लाखांच्या दरम्यान आहे.
आयशर कंपनीचा Eicher 242 हा २५ अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरची किंमत २.०५ लाख ते ४.४० लाखांच्या दरम्यान आहे.
स्वराज कंपनीचा Swaraj 724XM हा ट्रॅक्टरसुध्दा २५ अश्वशक्तीचा असून याची किंमत ४.०७ लाख ते ५.०५ लाखांच्या दरम्यान आहे.
कुबोटा कंपनीचा निओस्टार A211N-OP हा २१ अश्वशक्तीचा ट्रक्टर आहे. या ट्रॅक्टरची किंमत ४.४० लाखांपासून सुरू होते.
सोनालिका कंपनीचा Sonalika GT-22 हा २२ अश्वशक्तीचा ट्रॅक्टर असून याची किंमत ४.२० लाख ते ४.५१ लाखांच्या दरम्यान आहे.