Animal Heat Stress : उन्हाळ्यात जनावरांना उष्माघाताचा धोका ; अशी घ्या काळजी

Mahesh Gaikwad

तापमानाचा पारा

दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. अशा दिवसांत जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

Animal Heat Stress | Agrowon

उष्माघात

वाढत्या तापमानामुळे जनावरांमध्ये उष्माघात होण्याचा धोका असतो. वेळीच उपचार न केल्यास जनावरे उष्माघाताला बळी पडतात.

Animal Heat Stress | Agrowon

तापमानात वाढ

उन्हाळ्यामध्ये वातावरणातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. वातावरणातील उष्णता जनावरांच्या शरीराद्वारे शोषल्यामुळे त्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान १०३ ते ११० फॅरेनहाईटपर्यंत वाढते.

Animal Heat Stress | Agrowon

उष्माघाताची लक्षणे

उष्माघात झालेल्या जनावरांमध्ये जनावर एका जागी उभा राहणे, बेचैन होणे, खाली बसणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. यालाच उष्माघात म्हणतात.

Animal Heat Stress | Agrowon

Animal Heat Stressजनावरांचा बचाव

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुपारच्यावेळी भर उन्हात जनावरे चरायला नेणे टाळावे. उन्हाच्या झळांपासून जनवारांचा बचाव करावा.

Animal Heat Stress | Agrowon

जड कामे

भर उन्हात जनावरांना जड कामांना जुपू नये. या काळात जनावरांना विश्रांती द्यावी. गोठ्याच्या पत्र्याला आतील बाजूस पांढरा रंग द्यावा. यामुळे गोठ्यातील तापमान कमी राहिल.

Animal Heat Stress | Agrowon

थंड पाणी फवारावे

उपाशी जनावरांकडून अवजड कामे करून घेणे टाळावे. पुरेसा चारा आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी. जनावरांच्या शरीरावर दिवसांतून २-३ वेळा थंड पाणी फवारावे.

Animal Heat Stress | Agrowon