Raw Mango : उन्हाळ्यात आवर्जून कैरी खाच ; कर्करोगाचा धोका टळेल

Mahesh Gaikwad

हापूस आंबा

कोकणातील हापूस आंबा आपल्या चव आणि सुगंधासाठी जगप्रसिध्द आहे. सध्या कोकणतून देशविदेशात आंबा पाठवला जात आहे.

Raw Mango | Agrowon

कैरीचे फायदे

आंबा पिकण्याआधी तो कैरी स्वरूपात असते. आंबा जितका खायला गोड तितकीच त्याची कैरी आंबट असते. पण या कैरीचेही आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

Raw Mango | Agrowon

औषधीय घटक

कैरीमध्ये अनेक औषधीय घटक असतात. यातील 'क' जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Raw Mango | Agrowon

कर्करोगाचा धोका

कैरीमध्ये कॅरोटीनॉईड मोठ्या प्रमाणात आढळते. ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका टळतो.

Raw Mango | Agrowon

ह्रदयाचे आरोग्य

याशिवाय कैरीमध्ये जीवनसत्त्व 'ब' आणि तंतुमय घटकही मुबलक प्रमाणात असतात. जे ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यासही मदत होते.

Raw Mango | Agrowon

अपचन

अपचन आणि पोट साफ न होण्याची समस्या जाणवत असेल , तर तुम्ही कैरी खावी. हमखास फरक जाणवेल.

Raw Mango | Agrowon

डोळ्यांचे आरोग्य

कैरीमध्ये आढळणारे झिआक्सॅन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

Raw Mango | Agrowon

रक्तदाब नियंत्रण

कैरीत पोटॅशिअमचे प्रमाणाही मुबलक असते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण राखण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावरही नियंत्रण राहून ह्रदयविकाराचा धोका कमी करता येतो.

Raw Mango | Agrowon

त्वचेचे आरोग्य

कैरीतील अँटीऑक्सिडंट घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे एजिंगची समस्या कमी होण्यास मगत होते.

Raw Mango | Agrowon
Gular Fig | Agrowon