Anuradha Vipat
सिल्कची साडी ही अशी ट्रेडिशनल आऊटफिट आहे जी प्रत्येक स्त्री परिधान करतेच. सिल्कची साडी खुप महाग असते
तर आज आपण सिल्क साडीची चमक टिकावी याकरिता कोणत्या चूका करणे टाळाव्यात आणि त्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल जाणून घेणार आहोत
सिल्कच्या साड्या नेहमी व्हेलवेटच्या कापडात गुंडाळाव्यात. यामुळे सिल्क कापड खराब होत नाही आणि त्याची चमकही राहते
इतर कपड्यांसोबत सिल्कच्या साड्या वॉर्डरोबमध्ये ठेवू नका. ते नेहमी कोरड्या जागी ठेवा
सिल्कच्या साड्या कोरड्या ठिकाणी ठेवा,तसेच त्यांच्या आसपास कडुलिबांची सुकलेली पाने, लवंग किंवा सिलिकॉन जेलचे पॅकिट ठेवा
साड्या जास्त वेळ हँगर्सला लावून ठेवल्याने त्यांच्यावर केलेले जड जरीकाम कापड कमकुवत करू लागते आणि साड्या सहजपणे फाटू शकतात