Aslam Abdul Shanedivan
हिवाळाचा कालावधी आपली हाडे मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम असून थंडीत शरीराची शोषण क्षमता अधिक असते.
या काळात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि इतर पोषक तत्वांनी युक्त पदार्थांचे सेवन केल्याने हाडांची मजबुती वाढते.
दूध, दही आणि चीज हे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे प्रमुख स्त्रोत आहेत. यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात.
हिवाळ्यात गूळ आणि तीळ सुपरफूड असून गुळामधील लोह, भरपूर खनिजे आणि तीळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम आहेत.
मेथी आणि मोहरीसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. जे हाडांची वाढीस मदत करतात.
बदाम, अक्रोड आणि चिया किंवा भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. जे हाडांमध्ये लवचिकता ठेवतात
सूर्यफुलाच्या बिया आणि मशरूम हे व्हिटॅमिन डीचे चांगले स्त्रोत आहेत. जे विशेषतः हिवाळ्यात हाडे मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे आहेत.