Bull Horn Cancer : बैलांना होतो शिंगांचा कॅन्सर ; ही आहेत लक्षणे

Mahesh Gaikwad

शिंगाचा कर्करोग

बैलांमधील गंभीर समस्या म्हणजे शिंगाचा कर्करोग. हा रोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील मोठ्या जनावरांना होतो.

Bull Horn Cancer | Agrowon

बैल रोगास बळी

कडक उन्हात शेतात विविध कामांसाठी वापरले जाणारे बैल या रोगास बळी पडतात. गाई, म्हशींमध्ये हा रोग कमी प्रमाणात आढळतो.

Bull Horn Cancer | Agrowon

शिंगांना रंग लावणे

बैलाच्या शिंगांना लावलेल्या रंगातील विषारी पदार्थांमुळे शिंगामध्ये सतत जळजळ होते, त्यामुळे हा रोग होऊ शकतो.

Bull Horn Cancer | Agrowon

शिंगाला खाज सुटते

शिंगाला खाज सुटून वेदना होणे, जनावर सतत डोके हलवत राहणे. तलेच जनावर झाडाला शिंग घासते किंवा टकरा मारते ही याची काही प्रमुख लक्षणे आहेत.

Bull Horn Cancer | Agrowon

शिंगातून आवाज

कर्करोग झालेल्या शिंगावर हलके स्टेनलेस स्टीलचे उपकरण (फोरसेप्स) मारून पाहिल्यावर त्यातून भद भद आवाज येतो. असा आवाज निरोगी शिंगातून येत नाही.

Bull Horn Cancer | Agrowon

रक्तमिश्रित स्राव

ज्या शिंगाला कर्करोग झाला आहे, त्या बाजूच्या नाकपुडीतून आणि शिंगाच्या बुडामधूनही रक्तमिश्रित स्राव येतो.

Bull Horn Cancer | Agrowon

वाकडे शिंग

कर्करोग झालेले शिंग एका बाजूला झुकते किंवा वाकडे होते. रोगाचे प्रमाण जास्त असल्यास शिंग हलते, थोड्याशा माराने गळून पडते.

Bull Horn Cancer | Agrowon