Animal Hoof Disease : जनावरांतील खुरांच्या आजाराची लक्षणे ; जाणून घ्या

Mahesh Gaikwad

जनावरांचे व्यवस्थापन

व्यवस्थापनातील चुकांमुळे जनावरांना बहुतांशवेळा खुरांचे आजार होण्याचा धोका असतो.

Animal Hoof Disease | Agrowon

खुरांचे आजार

माणसांप्रमाणेच जनावरांच्या खुराचे बाहेरील आवरण हे केरोटिनपासून बनलेले असते. आवश्यकतेपेक्षा जास्त वाढलेल्या खुरामुळे जनावर लंगडते.

Animal Hoof Disease | Agrowon

भेगा पडलेले खुर

बायोटीन, झिंक क्षारांच्या कमतरतेमुळे खुरांवर भेगा पडतात. या भेगा उभ्या आणि आडव्या असतात.

Animal Hoof Disease | Agrowon

सडलेले खुर

दोन खुरांच्या मध्यभागी जखम होते. या जखमेतून घाण वास येणारा स्त्राव येतो. यामुळे जनावरांना चालताना वेदना होतात आणि ते लंगडते.

Animal Hoof Disease | Agrowon

खुरांच्या तळव्यावरील अल्सर

जनावरांना कामाचा अति ताण, जास्त अंतर पायी चालवणे, गरम जमिनीवर जास्त काळ चालणे तसेच बसण्याची जागा कडक असणे अशा कारणांमुळे जनावरांच्या तळव्यावर अल्सर होतो.

Animal Hoof Disease | Agrowon

खुराला छिद्र पडणे

टोकदार खिळा, काटा किंवा वायर यामुळे खुराला छिद्र पडते. खुराला छिद्र पडल्यामुळे जंतुसंसर्ग होवून जनावर लंगडते.

Animal Hoof Disease | Agrowon

खुरांमधील गाठ

काही जनावरांमध्ये खुरांमध्ये गाठ येते. हाही खुराशी संबंधित आजार आहे.

Animal Hoof Disease | Agrowon
Animal Care | Agrowon