Aslam Abdul Shanedivan
हिंदीमध्ये केशर, तमिळमध्ये कुनकुमापू आणि अरबी भाषा आणि बंगाली भाषेमध्ये याला जाफरान असे म्हटले जाते.
केशर हे जगातील सर्वात महागड्या मसाल्यांपैकी एक असून त्याला लाल सोने असे म्हटलं जाते. केशरचा रंग आणि सुगंध हा त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवतो.
इराण हा केशराचा सर्वात मोठा उत्पादक देश असून तेथे जगाच्या 90 टक्के उत्पादन होते. भारतातील जम्मू-काश्मीर हे सर्वात मोठे केशर उत्पादक राज्य आहे. केशर उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
केशरमध्ये असलेले कॅरोटीनॉईडमुळे पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढते. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
केशरमध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, ज्यामुळे डोळ्यांतील रक्त प्रवाह सुधारतो आणि आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढते. यातील अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म रेटिनाला आराम देण्यात मदत करतो.
केशरमध्ये स्तन, त्वचा, फुफ्फुस, यकृत इत्यादी सर्व प्रकारच्या कर्करोगांशी लढण्यारे गुणधर्म असतात. क्रोसिन नावाच्या रसायनामुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. नवीन कर्करोगाच्या पेशी तयार होत नाहीत.
गर्भावस्थेमध्ये केशरचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास याचे अनेक फायदे मिळू शकतात. ज्यामध्ये मूड-स्विंग्ज कमी होणे, क्रॅम्प्सपासून आराम, लोहाचे प्रमाण वाढणे, मॉर्निंग सिकनेसपासून आराम इत्यादी फायद्यांसह चांगली झोप येते.