Aslam Abdul Shanedivan
फाउल कॉलरा म्हणजेच पटकी हा रोग पाळीव आणि जंगली अशा दोन्ही कोंबड्यांमध्ये दिसतो. जो जिवाणूद्वारे होतो.
पटकी हा रोग कोंबड्यांमध्ये रक्तदोष (सेप्टीसेमिया) तयार होऊन होतो.
तर हा रोग संसर्गजन्य असल्याने तो पाच ते आठ दिवसांत राहतो. तर याची लक्षणे ही तीव्र आणि सौम्य अशा दोन प्रकारांत दिसतात
तर तीव्र प्रकारात कोंबडीचा कोणतीही लक्षणे न दिसता सहा ते बारा तासांत मृत्यू होतो.
या आजाराची कोंबड्यात हिरवट रंगाचा अतिसार, नैराश्य, श्लेष्मा अतिसार, विस्कटलेले पंख, फुफ्फुस दाह, आणि जलद श्वसन अशी लक्षणे दिसतात
तर दीर्घकालीन सौम्य उद्रेकात छाती, कल्ले, सांधे, पायाचे तळवे यात फायब्रीनस पूरक स्त्राव साचल्यामुळे सूज येते
डोळ्यांच्या श्लेश्म त्वचेचा आणि कंठाचा दाह होतो. डोळ्यांतून अश्रू गळतात. डोळे, तुरे आणि कल्ले सुजतात. ते निळसर काळे पडतात. बाधित कोंबड्या लंगडतात.