Team Agrowon
हिवाळ्यात गायी म्हशी विण्याचे प्रमाण जास्त असते. याचे कारण त्यांच्यांत येणारे विविध चयापचयाचे आजार. यात प्रामुख्याने दुग्धज्वर आढळून येतो.
हा आजार प्रामुख्याने जास्त दूध देणाऱ्या संकरित गाई आणि म्हशींमध्ये दुग्धज्वर आढळून येतो.
हा आजार साधारणपणे व्यायल्यानंतर पहिल्या ७२ तासांपर्यंत जास्त प्रमाणात आढळून येतो. दुभत्या जनावरांमध्ये तिसऱ्या ते पाचव्या वेतामध्ये आजार दिसतो.
दुधाळ जनावरांची निगा, आरोग्य, आहार व व्यवस्थापन योग्यप्रकारे न करणे हे चयापचय आजार होण्यामागचे मुख्य कारण आहे.
प्रसूतीनंतर दूध देण्याचा कालावधी तसेच चीक आणि दूध उत्पादनासाठी कॅल्शिअमची मागणी शरीराच्या कॅल्शिअम पुरवठा करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असते, तेव्हा आजार दिसतो.
आहारातील कॅटायन आणि अनायन असंतुलनामुळे दुग्धज्वर होतो. उच्च डी कॅड असलेले पशुखाद्य आहारामध्ये आल्यास या आजाराची शक्यता वाढवते. आहारामध्ये नकारात्मक डी कॅड हा आजार रोखू शकते.