Mahesh Gaikwad
भारतात सापाच्या विविध प्रकारच्या जाती आढळतात. जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये साप हा सर्वात धोकादायक प्राणी आहे.
भारतात अनेक प्रकारच्या सापाच्या प्रजाती आहेत, ज्यामध्ये काही बिनविषारी तर काही विषारी साप आहेत.
भारतात सापाच्या ३५० हून अधिक वेगवेगळ्या जाती आढळतात. यापैकी १७ सापांच्या जाती विषारी आहेत.
याशिवाय निसर्गामध्ये समुद्रात पोहणारा साप, हवेत उडणारा साप तुम्हाला माहिक असेल. पण तुम्ही मरण्याचा अभिनय करणारा साप पाहिलाय का?
हो. धोक्याची जाणीव होताच मरण्याची अॅक्टींग करण्यासाठी हा साप प्रसिध्द आहे. शिकाऱ्याला गंडवणाऱ्या या सापाचे नाव आहे Dice Snake.
मरण्याचा अभिनय करताना हा साप तोंडातून चक्क रक्तही काढतो. इतका याचा अभिनय खरा असतो.
शिकाऱ्यांना फसविण्यासाठी हा साप फडफड करतो आणि विष्ठेचा तीव्र वास सोडतो. यानंतर तो मरण्याचे नाटक करतो.
हा साप उत्तर मॅसेडोनियातील गेलेम ग्रॅड बेटावर आढळतो. अलिकडेच प्रकाशित झालेल्या एका संशोधनामतून असे केल्यामुळे या सापाला जगण्यासाठी मदत होते.