Mahesh Gaikwad
सीआरडी हा कोंबड्यांमध्ये मायकोप्लाझमा गैलिसेप्टिकम नावाच्या जीवाणूद्वारे श्वसनसंस्थेस जडणारा संसर्गजन्य आजार आहे.
मांसल, अंडी देणाऱ्या तसेच ब्रीडर कोंबड्यांना हा आजार होऊ शकतो. तसेच बदक, तितर, टर्की आणि कबुतरांमध्येही हा आजार दिसून येतो.
कोंबड्यांमधील सीआरडी आजाराचा प्रतिबंध आणि उपचार योग्यवेळी न केल्यास मरतुक वाढते.
या आजारामुळे कोंबड्यांची श्वसनसंस्था बाधित होते. तसेच श्वसनाशी संबंधित विकार उद्भवतात.
बाधित झालेल्या दिड ते दोन किलोच्या दिसणाऱ्या मांसल कोंबड्यांचे वास्तविक वजन अपेक्षेपेक्षा खूप कमी दिसते.
बाधित कोंबड्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. श्वास घेतेवेळी कोंबड्या घर्रघर्र आवाज करतात. शिंकतात आणि खोकलतात.
पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन आवश्यक उपचार करावेत. प्रतिजैवके देऊन या आजाराचा कायमस्वरूपी उपचार होऊ शकत नाही.