Swine Flu H1N1 Symptoms : संसर्गाचा धोका टाळा: स्वाइन फ्लूची सुरुवातीची लक्षणे आणि बचावाचे सोपे घरगुती उपाय

Anuradha Vipat

श्वसनसंस्थेचा आजार

स्वाइन फ्लू हा इन्फ्लूएंझा 'ए'या विषाणूच्या उपप्रकारामुळे होणारा एक संसर्गजन्य श्वसनसंस्थेचा आजार आहे.

Swine Flu H1N1 Symptoms | agrowon

संक्रमित

हा आजार एका संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे खोकण्याद्वारे किंवा शिंकण्याद्वारे सहज पसरू शकतो.

Swine Flu H1N1 Symptoms | agrowon

लक्षणे

स्वाइन फ्लूची लक्षणे सामान्यतः नेहमीच्या फ्लू किंवा तापासारखीच असतात, पण ती अचानक आणि वेगाने वाढू शकतात.

Swine Flu H1N1 Symptoms | agrowon

तीव्र ताप आणि थंडी

तीव्र ताप आणि थंडी वाजून येणे. सतत खोकला येणे आणि घसा खवखवणे. प्रचंड अंगदुखी, स्नायूंमध्ये वेदना आणि डोकेदुखी, तीव्र थकवा आणि अशक्तपणा जाणवणे,नाक वाहणे किंवा नाक चोंदण.

Swine Flu H1N1 Symptoms | agrowon

डॉक्टरांकडे कधी जावे?

जर रुग्णामध्ये खालील गंभीर लक्षणे दिसली, तर त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत सतत दुखणे..ओठ किंवा चेहरा निळसर पडणे.सतत चक्कर येणे किंवा गोंधळलेली स्थिती निर्माण होणे.शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणे .

Swine Flu H1N1 Symptoms | agrowon

हात वारंवार धुवा

घराबाहेरून आल्यावर, जेवण्यापूर्वी किंवा खोकल्यानंतर आपले हात साबण आणि पाण्याने किमान २० सेकंद स्वच्छ धुवा किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करा.

Swine Flu H1N1 Symptoms | agrowon

लसीकरण

स्वाइन फ्लूपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे दरवर्षी इन्फ्लूएंझा प्रतिबंधक लस घेणे.

Swine Flu H1N1 Symptoms | agrowon

Horoscope 6 October 2026 : कामाच्या ठिकाणी स्थिती समाधानकारक राहील, मोठी जबाबदारी येऊ शकते

Horoscope 6 October 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...