Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी बटाट्यापेक्षा रताळे हा एक उत्तम आणि अत्यंत आरोग्यदायी पर्याय मानला जातो.
रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
रताळ्यामध्ये विद्रव्य फायबर असते, जे पचनक्रिया मंद करते. यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही
रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. याचा अर्थ असा की रताळे खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
रताळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते आणि चयापचय क्रिया मजबूत करून चरबी वेगाने जाळण्यास मदत करते.
रताळे उकडल्याने त्यातील पोषक तत्वे टिकून राहतात आणि फॅट्स अजिबात वाढत नाहीत.
तुम्ही रताळे ओव्हनमध्ये किंवा गॅसवर तव्यावर हलके भाजून घेऊ शकता. भाजलेल्या रताळ्याची चव खूप छान लागते.