Anuradha Vipat
गावरान पद्धतीने बनवलेले लिंबाचे गोड लोणचे हे चवीला चटपटीत लागते आणि जेवणाची चव वाढवते.
आज आपण पाहूयात गावरान पद्धतीने चटपटीत लिंबाचं गोड लोणचं बनवण्याची सोपी पद्धत.
लिंबे, गूळ, मीठ, लाल तिखट , हळद, जिरे पूड , पाणी , गरम मसाला.
लिंबे स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्या. लिंबाच्या ८ किंवा १० फोडी करा. लिंबाच्या फोडी मीठ आणि हळद लावून ठेवा. कुकरमध्ये२ ते ३ शिट्ट्या करून घ्या.
लिंबाच्या फोडी, मीठ, हळद आणि थोडे पाणी घालून मंद आचेवर शिजू द्या. लिंबे मऊ शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, भाजलेली जिरे पूड आणि गूळ घाला. सर्व मिश्रण चांगले मिसळून घ्या.
आता हे मिश्रण मंद आचेवर गूळ पूर्णपणे विरघळेल आणि लोणच्याला घट्टपणा येईपर्यंत आणि चिकट होईपर्यंत शिजवा.
लोणचे पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर लोणचे एका स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.