Anuradha Vipat
घरच्या घरी स्वीट होमसारखी खुसखुशीत आणि रसरशीत बालूशाही बनवण्यासाठी खालील रेसिपी स्टेप-बाय-स्टेप फॉलो करा.
मैदा, तूप , बेकिंग सोडा, साखर, वेलची पूड आणि केशर, तूप किंवा तेल , दही
मैदा घेऊन त्यात बेकिंग सोडा आणि साजूक तूप घालून नीट मिसळून घ्या. त्यात दही घालून एकत्र करा. १५-२० मिनिटे पीठ झाकून ठेवा.
साखर आणि पाऊण वाटी पाणी घेऊन उकळायला ठेवा. पाकात वेलची पूड आणि केशर घाला.
पिठाचे छोटे गोळे करून मध्यभागी अंगठ्याने खड्डा करा. यामुळे बालूशाही आतून व्यवस्थित तळली जाते
कढईत तूप/तेल मंद आचेवर गरम करा. बालूशाही तेलात सोडल्यावर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर तळा
तळलेली गरम बालूशाही कोमट पाकात टाका. ५-१० मिनिटे पाकात राहू द्या आणि नंतर बाहेर काढा