Anuradha Vipat
उन्हाळ्यात घामामुळे केस तेलकट होणे, चिकटणे आणि टाळूला खाज सुटणे या समस्या सामान्य आहेत.
घामामुळे केसांची मुळे कमकुवत होऊन केस गळू शकतात. हे रोखण्यासाठी खालील प्रभावी उपाय नक्की करून पाहा.
उन्हाळ्यात आठवड्यातून किमान २-३ वेळा सौम्य शॅम्पूने केस धुवा.
केस धुण्यासाठी गरम पाणी वापरू नका. कोमट किंवा थंड पाणीच वापरा.
अर्ध्या लिंबाचा रस पाण्यात मिसळून त्याने टाळूला मालिश करा. यामुळे घामाचा वास जातो.
अंघोळीपूर्वी १०-१५ मिनिटे ताज्या कोरफडीचे जेल टाळूला लावा. हे नैसर्गिक थंडावा देते आणि घाम कमी करते.
दह्यामध्ये थोडे लिंबू मिसळून केसांना लावल्याने केसांचा चिकटपणा कमी होतो आणि केस चमकदार होतात.