Aslam Abdul Shanedivan
कमी झालेला पाऊस, कमी झालेल्या पेरण्यांसह दुबार पेरणी केलेलं पिक देखील अवकाळीत गेल्याने शेतकरी संकंटात सापडला आहे. अशात आता कर्जाचं काय असा सवाल त्यांच्या समोर उभा आहे.
याचदरम्यान नाशिक विभागात ऊस उत्पादकांसाठी दिसाला दायक बातमी आली आहे. दुष्काळ सदृश जाहीर केलेल्या महसूल मंडलांत शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून कर्जवसुली होणार नाही.
याबाबत सहकार विभागाने स्थगिती आदेश काढत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या आदेशामुळे आता उसाच्या रकमेतून सेवा सहकारी सोसायट्या, बँकांना वसुली करता येणार नाही.
याबाबत नाशिक विभागाचे विभागीय सहनिबंधक विलास गावडे यांनी तसा आदेश काढत जिल्हा सहकारी बँकेला पत्र दिलं आहे. तर कर्जवसुलीबाबत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती.
साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. तर साधारण ८० टक्के कर्ज ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज घेतलं आहे.
तर शेतकरी ऊस कार्यक्षेत्राएवजी अन्य कारखान्यांना देत आहेत. कारखाने देखील बँक तथा विकास सेवा सहकारी सोसायट्यांना पावत्या न दाखवता रक्कम परस्पर रोखीने देत आहे असा दावा केला आहे.
थेट रक्कम शेतकऱ्यांना दिल्याने सहकारी संस्थेच्या वसुलीवर परिणाम होत आहे. हा दावा जिल्हा सहकारी बँकेकडून केला गेला असून याबाबत त्यांनी विभागीय सहनिबंधकांकडे दाद मागितली होती. याचदरम्यान, दुष्काळ जाहीर झालेल्या हे आदेश आले आहेत. या आदेशामुळे राज्यातही असा निर्णय होण्याची शक्यता आहे.
या आदेश आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नाशिक विभागाच्या विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयानुसार राज्यातही असा निर्णय होण्याची शक्यता आहे.