Anuradha Vipat
काही लोक वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्याच्या कारणास्तव आपल्या आहारातून गव्हाची पोळी पूर्णपणे वगळतात किंवा कमी करतात.
गव्हामध्ये ग्लूटेन नावाचे प्रोटीन आणि जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात.
जेव्हा तुम्ही गव्हाची पोळी खाणे बंद करता, तेव्हा शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी होतात. यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.
गव्हाची पोळी न खाल्ल्याने पोट फुगणे, अपचन, गॅस आणि ॲसिडिटी यांसारख्या पचनाच्या समस्या पूर्णपणे थांबतात आणि पोट हलके वाटते.
गव्हाचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' जास्त असतो, ज्यामुळे पोळी खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते.
दुपारच्या जेवणात गव्हाच्या पोळ्या खाल्ल्यानंतर अनेकांना आळस किंवा तीव्र झोप येते.
ग्लूटेनमुळे काही लोकांच्या आतड्यांमध्ये आणि शरीरात अंतर्गत सूज निर्माण होते, ज्यामुळे सांधेदुखी किंवा त्वचेच्या समस्या वाढू शकतात.