Anuradha Vipat
पुरुष अनेकदा त्वचेच्या काळजीकडे दुर्लक्ष करतात किंवा मित्रांचे/घरातील महिलांचे स्किनकेअर प्रॉडक्ट्स वापरतात. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते
पुरुषांच्या त्वचेची रचना महिलांपेक्षा वेगळी आणि जास्त जाड व तेलकट असते. त्यामुळे पुरुषांनी स्किनकेअर करताना खालील मुख्य चुका टाळल्या पाहिजेत.
अंगाच्या साबणामध्ये तीव्र रसायने असतात, जी चेहऱ्याची त्वचा कोरडी बनवतात, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि पिंपल्स येऊ लागतात.
सूर्याच्या अतिनील किरणांमुळे पुरुषांची त्वचा टॅन होते, काळे डाग पडतात आणि अकाली वृद्धत्व येते.
चेहरा धुतल्यानंतर त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी पडल्यास ती स्वतःचे रक्षण करण्यासाठी अधिक तेल तयार करते, ज्यामुळे पिंपल्स येतात.
घाईघाईत कोरड्या त्वचेवर शेव्हिंग करणे किंवा जुना ब्लेड वापरणे ही पुरुषांची मोठी चूक असते.
तुमची त्वचा कोरडी , तेलकट की संवेदनशील आहे हे न ओळखता कोणतेही क्रीम वापरणे.