Anuradha Vipat
भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानले जाणारे पिंपळाचे झाड आयुर्वेदानुसार औषधी गुणांचा प्रचंड मोठा खजिना आहे.
याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स, फायबर, व्हिटॅमिन ए, बी, के, आणि कॅल्शियम यांसारखे अनेक महत्त्वाचे घटक आढळतात.
पिंपळाच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
दम्याचा किंवा छातीत कफ जमा होण्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी पिंपळाची पाने वरदान आहेत.
जर तुम्हाला गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा तीव्र त्रास असेल, तर पिंपळाची पाने उकळून त्याचे पाणी प्यायल्याने पोट पूर्णपणे साफ होते.
पिंपळाच्या पानांचा अर्क इन्सुलिनची पातळी सुधारण्यास आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नैसर्गिकरीत्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
याची ताजी पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स आणि काळे डाग कमी होतात. तसेच एखादी जखम किंवा सूज आल्यास पानांचा लेप लावल्याने जखम जलद गतीने भरून येते