Mahesh Gaikwad
पावसाळ्याच्या दिवसांत बाजारामध्ये गर्द जांभळ्या रंगाच्या जांभळांची रेलचेल पाहायला मिळते. जांभूळ जितके फायदेशीर असते, तितक्याच त्याच्या बियाही आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
जांभूळ खाल्ल्यानंतर फेकून दिल्या जाणाऱ्या जांभळाच्या बियांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. चला तर मग जाणून घेवूयात याचे फायदे.
जांभळाच्या बियांची पावडर करून सेवन केल्यामुळे आरोग्याला विविध प्रकारे फायदे होतात.
जांभळाच्या बियांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि अम्लपित्त, जुलाब, अपचन यांपासून आराम मिळतो.
जांभळाच्या बियांची बारीक पावडर करून चेहऱ्यावर लेप लावल्यास मुरूम, डाग, पुरळ कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचा स्वच्छ व नितळ होते.
जांभळाच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यात मदत करतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
आयर्न, कॅल्शियम व फायटोकेमिकल्सने भरपूर अशा जांबळाच्या बिया शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी फायदेशीर असतात.
जांभळाच्या बिया उन्हात चांगल्या वाळवून घ्या. त्याची बारीक पावडर करून दररोज सकाळी एक चमचा कोमट पाण्यासोबत घ्या. हा उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.