Mahesh Gaikwad
काळी वेलची हा एक मसाल्याचा प्रकार असून जेवणाची चव वाढविण्यासाठी याचा वापर केला जातो. विशेषत: भारतीय मांसाहारी जेवणात याचा वापर केला जातो.
जेवणाची चव वाढविण्याबरोबरच काळ्या वेलचीचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत.
काळ्या वेलचीमध्ये उष्ण गुणधर्म असतात, जे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. तसेच बुध्दकोष्ठतेसाठी फायदेशीर आहे.
काळ्या वेलचीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे तोंडातील बॅक्टेरियाशी लढण्यास आणि तोंडाच्या दुर्गंधीस प्रतिबंध करण्यास मदत करते.
काळ्या वेलचीमधील औषधी घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर असतात. ज्यामुळे विविध संसर्गापासून बचाव होतो.ॉ
यामध्ये अँटीॉऑक्सिडंट्स आणि इतर औषघी घटक असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासह कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवण्यास मदत करतात.
यातील औषधी घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते.
तसेच यामधील अँटी-ऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखतात. परिणामी कर्करोगाचा धोका कमी होतो. काळी वेलची खाण्यापूर्वी अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.ॉ