Mahesh Gaikwad
योगासनाच्या विविध प्रकारापैकी पद्मासन हे एक ध्यानात्मक आसन आहे. यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारते.
पद्मासनामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे ह्रदय निरोगी राहते. तसेच शरीराच्या इतर भागांत रक्त प्रवाह सुरळीत होतो.
पद्मासन केल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो. ध्यान आणि प्राणायामासाठी हे आसन अतिशय प्रभावी मानले जाते.
या आसानामुळे गुडघे आणि सांध्यांमधील संधिवाताच्या वेदना कमी करण्यासही फायदेशीर आहे.
पद्मासनामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय पोटाच्या अपचन, गॅस यासारख्या इतर समस्यांपासून मुक्तता मिळते.
या आसनामुळे पाठीचा कणा सरळ राहतो आणि तसेच पाय आणि पोटातील अवयवांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो.
ध्यानादरम्यान या आसनात बसल्यामुळे मेंदू अधिक एकाग्र राहतो, त्यामुळे लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.
पद्मासनामुळे पाय, कंबर आणि पाठ मजबूत होते. सांध्यांची लवचिकता वाढते आणि स्नायूंना योग्य ताण मिळतो.