Anuradha Vipat
नात्यातील गोडवा आणि जवळीक वाढवण्यासाठी सरप्राइज गिफ्ट्स देणे हा एक उत्तम मार्ग आहे.
गिफ्ट महागडेच असायला हवे असे नाही, तर त्यामागील तुमच्या भावना महत्त्वाच्या असतात.
नाते अधिक घट्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरला खालीलप्रमाणे सुंदर सरप्राइज गिफ्ट्स देऊ शकता.
तुमच्या दोघांच्या पहिल्या भेटीपासून ते आत्तापर्यंतच्या सुंदर क्षणांचा एक छान फोटो अल्बम किंवा 'कोलार्ज फ्रेम' तयार करून द्या.
आजकालच्या डिजिटल जमान्यात हाताने लिहिलेले पत्र मनाला जास्त भिडते. तुमच्या भावना कागदावर उतरवून त्यांना द्या.
घरीच किंवा एखाद्या छान रेस्टॉरंटमध्ये कँडल लाईट डिनर प्लॅन करा.
जर त्यांना संगीताची आवड असेल तर ब्लूटूथ स्पीकर, किंवा फिटनेसची आवड असल्यास 'फिटनेस बँड' गिफ्ट करा.