Anuradha Vipat
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणे नेहमीच खूप आनंददायी असते.
बीचवर जाण्यापूर्वी तुमच्या ट्रॅव्हल बॅगेत खालील अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहेत की नाही हे नक्की तपासून घ्या.
समुद्राच्या ठिकाणी कडक ऊन आणि अतिनील किरण त्वचेला थेट इजा पोहोचवू शकतात.
तीव्र उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचा युव्ही-प्रोटेक्टेड गॉगल आवश्यक आहे.
डोके आणि चेहरा उन्हापासून वाचवण्यासाठी एक मोठी आणि स्टायलिश 'सन हॅट' सोबत ठेवा.
समुद्रकिनाऱ्यासाठी वॉटरप्रूफ आणि सहज धुता येतील अशा चपला किंवा स्लीपर्स वापरा.
पाण्यात मनसोक्त डुंबल्यानंतर बदलण्यासाठी सुती आणि हलक्या कपड्यांची अतिरिक्त जोडी सोबत असणे गरजेचे आहे.